Saturday, January 24, 2026

Maharashtra's funeral pyre!!

 If I despite being atleast an average writer, don't write against the tyrannical regime of BJP or all the rulers in Delhi who are out to destroy the Marathi language, or rather, Maharashtra the identity of my state...

If, even today, seeing the devaluation of the surrounding social and traditional circumstances, our pen doesn't flare up...

Seeing my marathi fellow men with a DNA that revolts against injustice, so misguided that they are now conspiring against their own Marathi culture...

If we remain silent and ignore it, and keep deluding ourselves into believing that the monster called BJP is not a monster but an angel...a sinner in the mask of savior!!!

Wouldn't that be considered highest form betrayal of our mother tongue, Marathi, the language we received from our mother's milk?

There is no greater misfortune than the fact that the number one Marathi-hating party in the country is receiving protection in Maharashtra. And the Marathi brothers who are rushing to defend them are so deeply immersed in their love for that party that they don't even realize that they are contributing to the destruction of their mother-like Marathi land for the very party which is building its castle on the funeral pyre of maharashtra?

Why don't we evaluate political parties based on principles?

It would have be only surprising if the venom that BJP carries and its foot soldiers who spew hatred for abandoning Hindutva, and the blind followers who beat the drum for the BJP without any regard for consequences or rational thought, hadn't affected the Shiv Sena, the real Shivsena.

The Shiv Sena has consistently taken positions that are supportive of Marathi or the state of Maharashtra. Even during Balasaheb's time, the Shiv Sena and Balasaheb himself supported the Congress for Pratibha Patil's presidential candidacy – that is history.

And shouldn't those who beat the drum for the BJP see that the cunning Fadnavis is enjoying the fruits of power by sitting with the very people he campaigned against, calling them corrupt? Where did your Hindutva go now? You put them in jail, and then you released them from jail and put them in power... some were even made Chief Ministers. Those who don't understand even after seeing all this are the blind followers, aren't they? And the BJP's agenda is that Hindutva means only the existence of Hindi.  In their definition of Hindutva, there is no place for the Marathi language or any language from South India. Even knowing this, the blind followers of this ideology, more than the political party itself, will be responsible for the permanent damage to the country by falling into the trap of this false concept of Hindutva.

And most importantly, when the BJP's steamroller runs over the country, everyone, including these blind followers, will be crushed under it.

Their plan is to corrupt the Indian judiciary, dismantle the constitution, seize control of the country's autonomous institutions, use central power and money to harass opposition leaders, and somehow grab power.

And then to praise themselves as the sole saviors... There is no greater example of narrow-minded intelligence for someone who calls himself a Chanakya!

There is no other party that wears the crown of eternal power on its head, leaves everything else exposed, roams around naked everywhere, and yet preaches the philosophy of patriotism to the people.

They criticize Pakistan for injustice, forced conversions, and atrocities against its minority communities, and then behave exactly the same way here. Handing over all the country's industries to a single businessman, imposing the language of Delhi's rulers on Maharashtra despite the linguistic reorganization of states, and then our own Chief Minister and his non-Marathi companions building the pyre of our own language and state – as if this wasn't enough, we have our own Marathi people happily carrying the urn of ashes of our state to the crematorium!!

To be continued!!!

Pankaj Kanade!!!

Friday, January 23, 2026

महाराष्ट्राची तिरडी बांधलीये!!

 मराठी भाषेची किंबहुना महाराष्ट्राची तिरडी बांधायला निघालेल्या भाजप अथवा समस्त दिल्लीश्वरांविरोधात जर लिहिले नाही..

जर आज ही आजूबाजूच्या सामाजिक, पारंपरिक परिस्थितिचे अवमूल्यन होताना पाहून सुद्धा आपली लेखणी चवताळली नाही...

अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा DNA असणाऱ्या माणसाला असं भरकटलेलं, आपल्याच मराठी संस्कृती विरुद्ध कारस्थाने करताना पाहून..

आपण शांत बसून दुर्लक्ष करून..समोर असलेला भाजप नावाचा राक्षस हा राक्षस नाही तर देवदूत आहे ह्या भ्रमात स्वतःला समजावत राहिलो...

तर आपल्या मायमराठी शी आपल्या आईच्या दुधातून मिळालेल्या भाषेशी केलेली ती गद्दारी ठरणार नाही का?

देशात असलेला 1 नंबर चा मराठी द्वेषी पक्षास महाराष्ट्रात अभय मिळावे या सारखे दुसरे दुर्दैव नाही..आणि त्यांची वकिली करण्यास सरसावत असलेले मराठी भैये जे त्या पक्षाच्या प्रेमात इतकं आकंठ बुडालेत की आपण आपल्या मातेसमान आईला आपल्या मराठी भूमीला सुद्धा उध्वस्त करणाऱ्यास हातभार लावतोय हे सुद्धा कळू नये?

का आपण तत्वांच्या आधारावर राजकीय पक्षाचे मूल्यांकन करत नाही?

हिंदुत्व सोडलं म्हणून गरळ ओकणारे भाजपीय अन जराही तमा न बाळगता अन सारासार विचार न करता भाजपचा ढोल बडवणारे अंधभक्त ह्यांच्या विषाचा सेनेवर फरक पडला नसता तरच नवल.

सेनेनं वेळोवेळी मराठी किंवा महाराष्ट्र राज्यास पूरक भूमिका घेतली आहे. अगदी बाळासाहेब असताना सुद्धा प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदा करिता सेनेनं बाळासाहेबांनी, काँग्रेस ला पाठिंबा दिलाय हा इतिहास आहे.

आणि भाजपचा ढोल बडवणाऱ्याना सुद्धा हे दिसू नये की धूर्त फडणवीसांनी ज्यांना भ्रष्ट म्हणून उर बडवून प्रचार केला त्यांच्याच साथीला बसून सत्तेचा मेवा खातायत..आता तुमचं हिंदुत्व कुठल्या शेपटीत घातलं? ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं त्यांनाच तुम्ही तुरुंगातून बाहेर काढून सत्तेत बसवलं..काहींना तर मुख्यमंत्री सुद्धा बनवलं. हे दिसुन ही ज्यांना कळत नाही तेच तर अंधभक्त आहेत ना?

आणि हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदीचेच अस्तित्व हाच भाजप चा डाव आहे..ह्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत मराठी भाषेला अथवा दक्षिणेतल्या कुठल्याच भाषेला स्थान नाही..हे माहीत असून सुद्धा हिंदुत्ववादाच्या खोट्या संकल्पनेत अडकून देशाचे कायमचे नुकसान करण्यास राजकीय पक्षापेक्षा त्यांचे अंधभक्तच जबाबदार असतील..

आणि मुख्य म्हणजे जेव्हा भाजपचा वरवंटा देशावर फिरेल तेव्हा सर्वांसकट अंधभक्त सुद्धा त्यात गाडले जातील..

भारतीय न्यायव्यवस्था नासडून, संविधान कोलमडून, देशाच्या स्वाययत्त संस्था हाताशी घेऊन, केंद्रीय सत्ता अन पैसा हाताशी घेऊन विरोधी पक्ष नेत्यांना त्रास देऊन कशी ही सत्ता ओरबाडून घ्यायची अन 

स्वतःला एक अकेला म्हणून वाह वाह करून घ्यायची.. स्वतःच स्वतःला चाणक्य म्हणनवुन घेण्यासारखं दुसर संकुचीत बुद्धिमान नाही!!

सत्तेचा अमरपट्टा डोक्याला लावून खालचं सगळं उघडं सोडून सगळीकडे नागडं फिरून लोकांना देशभक्तीचं तत्वज्ञान शिकवणारा दुसरा पक्ष ही नाही..

ज्या पाकिस्तानवर तेथील अल्पसंख्याक समाजावर अन्याय, धर्मांतर, अत्याचार करतात म्हणून टीकास्त्र सोडायच अन आपण ही इथे तसेच वागायचे. देशातील सारे उद्योगधंदे एकाच व्यापाऱ्याच्या हातात द्यायचे, भाषिक प्रांतरचना असून ही दिल्लीश्वरांची भाषा महाराष्ट्रवर लादणाऱ्या, आपल्याच भाषेची आपल्याच राज्याची तिरडी बांधणारा आपला मुख्यमंत्री अन त्याच्या साथीला असलेले परप्रांतीय खांदेकरी हे कमी होते का काय तर पुढे आपल्या राज्याची राख करून त्याचं मडकं पकडून आनंदाने स्मशानभूमीत नेत असलेला आपलाच मराठी माणूस !!


पुढील भाग लवकरच!!!

पंकज कानडे!!!

Tuesday, March 24, 2020

अधिरथ!!!!


कधी हा दहशदवाद्यांच्या गोळ्यांचा मार खातो,
ऊन पावसाचे हेलपाटे सहन करतो..
माझ्या राज्याचं रक्षण करणारा वर्दीतला माणूस
छोटयाशा चाळीत मध्यम वर्गीय म्हणून राहतो..

ह्याने केलेल्या कामाची किर्ती होते चोहीकडे
ह्याने गाळलेल्या घामाची चर्चा होते चोहीकडे
शहरं, राज्य पुन्हा वसवायला हे अधिरथ होतात ..
ह्याला विसरून आपली आयुष्य नेहमीप्रमाणे पूर्ववत होतात...

चिरीमिरी घेतात असे आपण बोल लावतो
वर्दीतले चोर म्हणून आपण त्याला हिणवतो
बाप, मुलगा, भाऊ अश्या अनेक भूमिका तोही निभावतो
वर्दीतला दर्दी आपण पाहायलाच अनेकदा विसरतो

निष्ठुर, निर्दयी असे आपल्या तोंडून सहजी निघत असेल..
पण मुलीला सासरी पाठवताना तो सुद्धा रडत असेल..
चिरीमिरी घेणार म्हणतो आपण
कधी विचार केला १०-१५ हजारात घर कसे चालत असेल??

सणासुदी ची सुट्टी असो वा क्रीडाविश्वाचे सामने असो..
ह्याच्या सुट्ट्याही वर्दी घालून त्यासोबत ड्युटीवर निघतात..
दिवसाचे २४ तास महिन्याचे ३१ दिवस ..
वेळ मिळालाच, तर डोक्याला धोंडा लावून निपचत पडलेले असतात..

रोज उठून युद्धावरच जणू जातात हे..
देवांची दारं बंद झाली तरी...
सुरक्षित वाटणाऱ्या शहरांचे
अधिरथ असतात हे
अधिरथ असतात हे
अधिरथ असतात हे

वर्दीतल्या दर्दी माणसाला माझा मानाचा मुजरा!!!
पंकज कानडे!!!

Tuesday, November 26, 2019

पुनःश्च जय महाराष्ट्र!!!

पुनःश्च जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्राच्या मातीची हीच ताकद आहे इथे भले भले जगजेत्ते येऊन हरतात. तुम्ही नाकारा, हिणवा, विभाजन करा..महाराष्ट्राची माती आपली ताकद दाखवतेच..
ती एकच वज्रमुठ मारते ज्याने अखंड सिंहासन घळाघळ होते!! मोदी शहाच्या बदमाशी कारवायांना महाराष्ट्राने अवघ्या २ दिवसांत निकालात काढले.

अहंकार माणसाला रसातळाला घेऊन जातो..अहंकारी माणूस आपल्या कारवायांमध्ये आणि मी पणामध्ये इतका गुंतून जातो की त्याला स्वतःपुढे काहीच दिसत नाही.
मी शरद पवारांना संपावणार म्हणता म्हणता स्वतःच नष्ट झाला..अन जाता जाता स्वतःच स्वतःच नाक कापून अख्या जगासमोर शोभा केली.

इथे विशेष आभार मानायला हवे हे भक्तांचे. शिवसेना संपली. हिंदुत्व संपल अश्या वल्गना किती वेळ केल्या असतील. भाजपवाल्यांना शिवसेनेने असं पछाडलं की सेनेचं नाव घेतलं नाहीतर त्यांना कळ सुद्धा लागत नसेल. भाजप च्या कुरापती कारवायांनी ते सत्तेत क नकोत हे त्यांनीच सिद्ध करून दाखवले आहे. साजुक तूप वाल्यांचा अहंकार नडला हे आता महाराष्ट्रातलं शेंबड पोर सुद्धा सांगेल. पण हा पराभव नाहीये ही हार आहे..यात अनेकांनी आपली आपली भूमिका निभावली आहे.. स्वतःच्या मस्तीत गाढ झोपलेल्या भाजपला संजय राऊतांना जे कानाखाली रोज च्या रोज फटकारे मारलेत त्या धक्क्यातून सावरले नाहीत तर आश्चर्य वाटायला नको. त्या नंतर आत्मघातकी वाटेल इतकं उद्धव ठाकरेंनी केलेलं युती सोडून केलेलं धाडस ये भाजप वाल्याना स्वप्नात देखील त्रास देणार हे नक्की.

काँग्रेस चे वडेट्टीवार असतील वा राष्ट्रवादी चे नवाब मलिक..प्रत्येकांनी आपली बाजू लावून धरली..
शरद पवारांसारख्या राजकारणातील भीष्माचार्यनी भाजप रुपी संकटांना परतवून लावलं..उरली सुरली जी काही इज्जत शाबूत होती ती मिटवायची काळजी अजित पवारांनी घेतली.
भाजप हा धक्का कितपत पचवते..की वाऱ्यावर भरती झालेले वाऱ्यावर पुन्हा गलती होतील. आता भाजप मध्ये अंतर्गत भुकंप झाल्यास आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्र या ऍसिड टेस्ट मधून गेला हेच बरे झाले..अख्या देशाला एक कठोर संदेश गेला असेल. Shivsena has defeated the Invincibles!! शेवटी मराठ्यांची औलाद आहे.. विशेष आभार पश्चिम महाराष्ट्राचे. त्यांनी भरभरून भाजप विरोधात मतदान केले..त्यामुळे आज भाजपची खरी बाजू समोर आली..एक ही मारा लेकीन सॉलिड मारा!!!!

आज प्रबोधनकारांचे शब्द आठवतात..
हा महाराष्ट्र काही लेच्यापेच्यांचा देश नाहीये..ही वाघाची औलाद आहे वाघाची..
आणि जर या वाघाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याचे काय पडसद होतात याचे इतिहासात दाखले आहेत!!
पुनःश्च जय महाराष्ट्र!!!
पंकज कानडे

Tuesday, April 9, 2019

मोदी विरुद्ध गांधी..एक खोटा सामना!! भाग-१

अटल बिहार वायपेयींचं संसदेतील गाजलेल्या भाषणांपैकी एक भाषणात ते असं म्हणतात,"सत्ता आयेगी जयेगी, लेकीन देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए" आजच्या भाजपला हे मूळ तत्वच मान्य नाहीये. जुनी भाजप ही आर.एस.एस. प्रणित होती..अनेकांची मते वेगवेगळी असतील पण आर.एस.एस. कडे संस्कार होते ते भाजपच्या सरकार चलनात दिसायचे. आणि त्यात संस्कारांचं प्रतीक म्हणजे भाजप कडून झालेले राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम.

मोदींना काहीही करून आधी सत्ता हवीय. काही लोकांना जमिनीवर पाय ठेऊन लोकसेवा करायची असते तर काहींना सर्व काही स्वतःकडे ठेवायची सवय असते फक्त हव्यास.. आजचे भाजप वाले दुसऱ्या गटात मोडतात.

आपला देश इतका महान आहे की एका चहावाल्या व्यक्ती ला ३ वेळा मुख्यमंत्री करू शकतो आणि १ वेळ प्रधानमंत्री करू शकतो..त्यामुळे देशाला मोदी किंवा गांधी मध्ये निवड करावी लागेल..किंवा मोदींशिवाय देशाला पर्याय काय? अश्या भंपक भाजपिय अफवांना सुरुंग लावा आता एकदाच.
ज्या देशाची लोकसंख्या १३५ कोटी आहे तिथे जर तुम्हाला वाटत असेल की देश चालवण्या लायक फक्त एक माणूस आहे तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे देशाची.

जिथे एका गरीबाचा मुलगा डॉ अब्दुल कलाम होऊ शकतो, एक गरीब घरातील मुलगी देशाची गानकोकिळा लता मंगेशकर होऊ शकते, जिथे मध्यमवर्गीय घरातील मुलगा देशाचा अन जगातील सर्वात मोठा क्रिकेटर सचिन तेंडुलकर होऊ शकतो तिथे त्या मातीत तुम्ही जर म्हणता की मोदींना पर्याय काय? तर मित्रानो तुमची मोदीभक्ती ही देशभक्ती वर पाय ठेऊन उभी आहे हे लक्षात घ्या.

ही भूमी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, मनोहर पर्रीकर, प्रकाश आमटे यांची भूमी आहे.मतितार्थ, तन मन हरपून देशासाठी कार्य करणाऱ्यांचीच भूमी आहे..आणि ही उदाहरणं आजच्या जगातील आहेत. त्यामुळे मोदींना पर्याय काय हे विचारताना स्वतःलाच एक चपराक मारून घ्या.

अहो मोदी विरुद्ध राहुल गांधी हा सामना नव्हताच कधी. एक धूर्त मुरलेला राजकारणी आणि एक बालिश लाडावलेला धनाढ्य घरातील बावळट मुलगा यात सामना कसा होऊ शकतो? तो सामना तुम्ही निर्माण केला..

हे म्हणजे हल्लीच भारतीय क्रिकेट संघाने सर्वात दुबळ्या ऑस्ट्रेलिया संघाला हरवून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. ते सुद्धा केले आपल्या संघाने. भाजप सुद्धा तेच करतेय.
काँग्रेसला हरवून मोठा तिर मारला नाही हो तुम्ही. मेलेल्याला मारण्यात कसली हुशारी?

राहूल गांधी ला पप्पू म्हणून(मी काँग्रेसी नाही, सो भक्तांनी लगेच मला काँग्रेसी , भारत विरोधी बोलू नये) आणि मग मोदींना पर्याय काय? राहुल गांधी? असे बावळट प्रश्न विचारून तुम्हीच मोदी आणि गांधी ला बाजूबाजूच्या पाटावर बसवलेत.

भक्तांना घरबसल्या देशभक्ती चं सर्टिफिकेट मिळाल्यासारखे वाटते स्वतःला मोदी भक्त म्हणवून घेताना. ही कसली शॉर्टकट मधली देशभक्ती? ही तर देहभक्ती!! अहो मोदी भक्त म्हणजे देश भक्त हे तुम्ही कोण ठरवणार?  आणि मोदी विरोधी म्हणजे "anti- national"? क्या बात! हे शॉर्टकट देशभक्त उर्फ मोदिभक्त तेच लोक आहेत जे देवळासमोरून जाताना बाहेरूनच निसटता चर्च मध्ये करतात तसे हातवारे करतात आणि निघून जातात...पाहिलेत का कधी हे शॉर्टकट भक्त?

राज ठाकरेंनी जेव्हा मोदींवर डबल बॅरल गन घेऊन पर्वा हल्ला केला तेव्हा भाजपवाले आणि आमचेच(दुर्दैवाने) स्वाभिमान भाड्याने घेणारे शिवसेनेवाले राज ठाकरेंना काँग्रेस चा भाडोत्री पक्ष म्हणतात तेव्हा हसू येते..कोण म्हणतात?? भाजप वाले ज्यांच्या पक्षात काँग्रेस मधलेच भाडोत्री उमेदवार आहेत ते!! आणि आमचे शिवसेनेचे वाघ जे भाजप समोर लोटांगण घालून युती करतात स्वाभिमान विसरून ते ही.

एक लक्षात ठेवा..ही मोदींची, सेनेची ,काँग्रेस ची वकिली बंद करा..उद्या अडचणीत आलात तर ह्यांच्या पैकी शाट्टा कोणी येत नाही मदतीला..मदतीला तेच येतील ज्यांच्या विरुद्ध कदाचित हे नेते तुम्हाला भडकवत असतील..

आणि हो जाता जाता..
कुठली ही अद्ययावत हत्यारे, कुठली ही सीमा, कुठला ही कायदा नसताना गेली जवळ जवळ हजारो वर्ष हिंदू धर्म अनेक आक्रमणानंतर सुद्धा जिवंत आहे १३५ कोटी जनतेच्या स्वरूपात. त्यामुळे आता देश धोक्यात आहे, हिंदू धोक्यात आहे असे म्हणणाऱ्यांना विचारा विकास कुठे गेला? आता जीएसटी, नोटिबंदी जी केली त्यावर मत का नाही मागत? अजून किती दशकं राम मंदिर या विषयावर मतं मागणार?

हे प्रश्न तुमच्या म्होरक्याना विचारा..तो पर्यंत माझा याच विषयावर दुसरा लेख येतोच आहे.

जय हिंद!