Tuesday, December 4, 2018

युगांत!! भाग ३


युगांत लिहिताना आजीच्या आयुष्यच सखोल वर्णन करताना नुसतं तिच्याच बद्दल लिहिल तर ते रास्त ठरणार नाही..आजूबाजूची परिस्थिती किति कीती वेळा बदलली आणि तरीही आजीने कसा वाहणाऱ्या पाण्याने दगडाच्या आजूबाजूने प्रवाह चालू ठेवावा तसा प्रवास चालू ठेवला म्हणून..

गिरगाव सुटलं...कायमचं!!
जिथे आमच्या आजी-आजोबांनी मुंबईतील आयुष्याची सुरुवात केली..जिथे माझं गाव मुंबई म्हणून गणलं गेलं..जिथे आमच्या तिर्थरूपंचा जन्म झाला..जिथे माझा जन्म झाला..जिथे आमच्या परमपूज्य आजोबांचा युगांत झाला..जिथे कुटूंबाला भूकंपाचे धक्के बसावे तसे धक्के बसले ते गिरगाव!!!! गिरगाव सोडताना पप्पांनी शपथ घेतली आता इथे पुन्हा येणार नाही. असे का?  काही गोष्टी गुलदस्त्यातच चांगल्या !!

१९९२ च्या दंगली ही आठवतात..ऑगस्ट १९९५ ला आमची बिल्डिंग पडली ते ही. त्याच्या जेमतेम १०-१२ दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्ट १९९५ ला आजोबा गेले. मी ७ वर्षांचा होतो. आजोबा गेले तेव्हा आमचे तीर्थरूप अजिबात रडले नाही!! घरातली सर्वात हळवी व्यक्ती रडली नाही!! ती पुढची अनेक वर्षे कण्हत होती!
आमची गांधीभुवन पडली ती रात्र...नाही नाही...मध्यरात्र मला अगदी स्पष्ट आठवते.. ऑगस्ट १९९५....ती भीती..तो गडद अंधार..

आमचे भाईकाका (सुहास- तिर्थरूपांचे थोरले बंधू) मला रात्रभर घेऊन बसलेले. आज अख्खी गांधीभुवन जागी होती ...मध्यरात्री. अग्निशमन दलाचे अधिकारी  घराघरात जाऊन स्वयंपाकघराच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. कुठे भिंतीला भेगा दिसतायत का ते पाहायला!!आणि तोच सकाळी ७ च्या सुमारास बिल्डिंग चा एक कोपरा गडगडण्याचा आवाज आला...आमची पळापळ..भाईकाकानी आम्हाला उचलून घेतले होते..एक हातात भाईकाकांची नेहमीची मनगटावर अडकवलेली सफेद पिशवी आणि सोबत आम्ही सोबत आम्ही..ते तसेच धावत खाली आले!! वाचलो!!! थोडक्यात!!!
या सर्व गदारोळात १०-१२ दिवसांपूर्वी आजोबा गेले असताना आमची आज्जी शांत होती!!! बुद्धासारखी!! काय वाटले असेल त्या मातेला?? ज्यांच्या सोबत जवळ जवळ अर्ध शतक संसार केला ते आजोबा गेले अन त्याच्या १०-१२ दिवसांतच त्यांच्या आठवणींची साक्षीदार बिल्डिंग पडावी.
त्या अर्धवट पडलेल्या बिल्डिंग मध्ये सुद्धा आम्ही अजून ४ वर्षे राहिलो. घरात दर एक दोन फुटाला लाकडाचे टेकू लावलेले..तिथेच गणपती, तिथेच दसरा आणि तिथेच दिवाळी!!
नंतर १९९९ साली समोरचे संडास पडले..आणि मग सुरुवात झाली गांधीभुवन सोडायची. हळू हळू घरं खाली होऊ लागली. पप्पांनी खूप धावपळ केली तेव्हा. आणि खूप शोधाशोध करून आम्ही बोरिवली ला रहावयास जायचे ठरवले. गांधीभुवन मधील शेवटचा दिवस तसा नीट आठवत नाही..पण एक गोष्ट मला स्पष्ट लक्षात आहे ती म्हणजे..बस मध्ये बसून निघताना आमची शलाका ताई आजिजवळ येऊन खूप रडली. आमचे ५० वर्षाचे शेजारी..कुटुंबाचा अविभाज्य भाग..मांजरेकर कुटुंबीय!! जवळजवळ २० वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग मला इतके वर्ष लक्षात कसा काय? कदाचित तो आजच्या लेखात नमूद व्हायचा म्हणूनच!! आजीची जादूचा वेगळी.जिथे जाईल तिथे लोकं आपसूकच तिच्या जवळ येत. आजीचा लळा हा कोणालाही आपोआपच लागे...

गिरगाव सुटलं आणि आम्ही बोरिवली ला येऊन स्थायिक झालो. ६ जून १९९९ रोजी. तारखा विसरता आल्या असत्या तरी किती बरे झाले असते? तारखांच्या जंजाळात अडकलेले संदर्भ सुद्धा मिटवता आले असते तर किती बरे झाले असते? असो...

एके काळी बोरीवली पश्चिमेतील २ अख्ख्या बिंडिंग ची मालकीण आजी..आज आयुष्याच्या उत्तरायणात त्याच बोरिवली पूर्वेला १८० स्क्वेअर फुटाच्या खोलीत राहायला आली..आता मन मोकळं करायला हक्काचा नवरा सुद्धा नव्हता!! तरीही शांत..बुद्धासारखी. आजीने तिचं पूर्ण उत्तरायण मला संस्कार करण्यात घालवले. त्यातले मी स्वतः अंगिकारले तो खरं तर वादाचा मुद्दा आहे!! बोरिवलीच्या नव्या सुरुवातीला थोडा त्रास झाला..पण इथे लोकं मात्र चांगली भेटली. गिरगाव ला चांगली भेटली असे नाही..गिरगाव मधील आप्तेष्ट अजूनही कुटुंबाचा भाग आहेत..आजन्म राहतील.

बोरीवलीतील आयुष्यात आजीने दोन गोष्टी केल्या..काकांची शुश्रूषा अन माझे लाड. बोरीवलीतील आयुष्य नीट जाऊ लागले..शांततेत खरेतर..आयुष्य मुंबई ला काढलेली आजी बोरिवलीच्या जुन्या आठवणी मागे टाकून पून्हा बोरीवलीत समरस झाली.. वाईट भूतकाळ समोर आला की आपण बेचैन होतो..होतो ना?? आजी विना तक्रार बोरीवलीत स्थिरावली..
माझ्या "युगांत" भागातील सर्व उल्लेखांची सुरुवात इथेच झाली..

गिरगाव ला न जाण्याच्या पप्पांच्या निर्णयाला आमचा आपसूकच होकार होता कारण ती वेळ येई पर्यंत आम्ही बोरीवलीकर झालेलो..तिथली जागा विकली अन गिरगाव कायमचं तोडलं. बोरीवलीतल्या नवीन घरातच आजीने मला तिच्या इतिहासाचा पेटीतील एक एक दागिना दाखवायला सुरुवात केली..माझ्या आयुष्यातील तो सुवर्ण काळ होता.आजी, मी आणि भाईकाका बाहेर च्या खोलीत झोपायचो. भाईकाकांची सर्व शुश्रूषा झाली की आजी माझ्यासोबत गप्पा करायची रात्री १-२ वाजेपर्यंत. आजीची मोडी लिपीतील वही, आजीचा चष्मा अगदी आजीचा मशेरीचा डब्बा सुद्धा..मी त्या सर्वांवर प्रेम केलं.

वर्षे सरत होती..छान जात होती..बोरीवलीत सुद्धा आजीने अनेक लोकं जोडली.आजीच्या प्रेमानेच आजीला भेटायला अनेक लोक यायची..ज्यांना आजीचं सहवास कधी मिळाला नाही त्यांना ती आपली आजी वाटायची..ज्ञानासाठी भुकेल्याना कदाचित ती सरस्वती वाटायची..आईचा सहवास नसलेल्यानं आई..इथे आजीची आपोआपच स्वतःची प्रतिमा तयार झाली जिच्या प्रभावाने अनेक लोक तिला भेटायला , बोलायला यायचे.

युगांत च्या आजच्या भागात एवढेच. पुढचा भाग शेवटचा!!
युगांत- भाग ३!! समाप्त.
त्या जगन्मातेस सलाम.🙏🙏🙏

Wednesday, October 17, 2018

युगांत!! भाग-२


युगांत!! भाग-२.
मराठी अन इंग्रजी भाषेवर आमच्या घरच्यांनी मजनू सारखं प्रेम केलंय. त्या मुळे जेव्हा इंग्रजी भाषेतील पकडी साठी लोकं जेव्हा माझी स्तुती करतात तेव्हा प्रत्येक वेळी सांगावं लागतं.. अरे बाबांनो असे काही नाही. जे काही आहे ते तीर्थरूपांचे आहे. आमच्यात ज्या २-४ गोष्टी आल्यात त्या त्यांच्या पिढीकडून. आजी बोलता बोलता सहज एखादा अभंग किंवा एखाद्या कादंबरीतील संदर्भ इतक्या सहजतेने द्यायची की तिने ते स्वतः लिहिले असेल.

१९४२ ते १९९९ या कालखंडात आम्ही गिरगाव येथे वास्तव्यास होतो. कदाचित गिरगाव चा तो सुवर्णकाळाचा शेवट होता. आता तिथे जाऊसे ही वाटत नाही. मुंबईला आल्यावर आजोबा कामासाठी प्रयत्न करू लागले. आजोबा आधी घरभाडे जमा करायचं काम करायचे. शिक्षणाने वकील असलेले आजोबा या पेक्षा ही मोठं काम करणार होतेच. आणि मला जितके माहीत आहे, आजोबा भारत सरकार मध्ये मुंबई रेशनिंग कमिशन चे डेप्युटी कलेक्टर होते. पंजाब मध्ये हरित क्रांती झाली तेव्हा मुंबई साठी गहू आणायच्या कामात आजोबांनी सुद्धा मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या साठी लाल दिव्याची गाडी यायची त्यांना रोज न्यायला. या सर्व गोष्टींचा आजीने ना कधी माज केला , ना कधी स्वतःच्या मौजेसाठी हट्ट केला ना तशी इच्छा ठेवली. 

आजीने तिच्या धाकट्या धीराची , नंदेंची लग्न घरच्या थोरल्या स्त्री ने करावी तशीच केली. नंडेच बाळंतपण सुद्धा तिने केलं. याच प्रवासात आजीला ५ मुलं झाली. आमचे थोरले काका- सुहास (त्यांचा आजीच्या आयुष्यावर या पूढे किती प्रभाव पडेल अन त्या मुळे तिचे आयुष्य किती ढवळून निघेल याची तिला किंचितशी ही कल्पना नसेल), आमचे मधले काका- विलास (PWD मधून सेवा निवृत्त झाले) अन आमचे तीर्थरूप (इंग्रजी भाषा प्रेमाचे जीन्स आजोबांकडून डायरेक्ट घेणारे, ऑक्सफर्ड ची चालती फिरती डिक्शनरी, कविता करुन घरात त्याच्या चिटोऱ्या फेकून देणारे.. या शिवाय आमच्या तिर्थरूपांनी अशी ही एक ओळख आहे की ते पेशाने डॉक्टर आहेत) , आमच्या आत्या- शोभा अन प्रभा(जिला आम्ही चम्या अँटी म्हणायचो..तिचं व्यक्तिमत्व वेगळं, सर्व नाव काढतात, पप्पा सांगतात ती कोणालाच घाबरायची नाही..एकदम बिनधास्त..आजोबांची डेरिंग बहुतेक तिला जीन्स मधून मिळाली असेल..आज मायलेकी एकमेकांना भेटून, एकमेकांच्या मिठीत खूप रडल्या असतील हे नक्की!).

५ मुलांचं आयुष्य, बाकी घरच्यांची लग्न , आजोबांच्या बड्या ऑफिसातून येणाऱ्या लोकांचा पाहुणचार हे करत करत आजी त्यात इतकी गुरफटून गेली की तिच्या माहेरचं कोणी वारलं तरी ती कधी गेली नाही, जाऊ शकली नाही.. जवळ जवळ ५० वर्ष तिने माहेर पाहिलं नाही. तो विरह आमच्या तिर्थरूपांनी तोडला आणि ते आजीला रावढळ ला घेऊन गेले. आजी तिथे जाई पर्यंत बाकीसर्वांचे देहावसान झाले होते. तरी एक चमत्कार झाला. जवळ जवळ वयाच्या ८५ व्या वर्षी रावढळ ला गेली असता आजीला तिची बालमैत्रीण भेटली अन तिने आजीला ओळखले सुद्धा.
विरह सहन होत नाही माणसाला. आजीने विरह नुसता सहनच नाही केला तो पचवला सुद्धा. अन त्याचा कधी सुगावा ही कोणाला लागू दिला नाही. तिच्या विरहाचे दुःख किती खोल आहे हे गेल्या अडीच वर्षात मी रोज पाहिलंय. अप्पा, किसन, काशीनाथ या तिच्या थोरल्या भावांचीच नावे तिच्या तोंडी ऐकलीयेत मी. गेल्या जवळ जवळ ५०-६० वर्षांत जिने माहेरचं नाव सुद्धा काढलं नाही, तिथे गेली नाही.. तीच माझी जगन्माता आज एक दिवस जात नाही जेव्हा ती माहेरच्या व्यक्तींचं नाव घेत नाही. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा तिची स्मृती गेली तेव्हा ती फ्लॅश बँक मध्ये गेली. जवळच्या भूतकाळातील सारे सारे विसरली..अन ५०-६० वर्षांपूर्वीची तिची नाती पुन्हा नव्याने जन्माला आली. मी नेहमी पप्पांना विचारायचो अहो हिला माहेरी कधीच कसं जावसं वाटलं नाही? त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तिनेच तिच्या नकळत दिलं..तिच्या विरहाच्या जखमा इतके वर्ष ओल्याच होत्या, स्मृती गेल्याने अन आम्हाला कोणाला ओळखू न शकल्याने त्या बाहेर आल्या.

आमचे थोरले काका पार्किन्सन डिसीज ने ग्रासलेले. जगात कोणाला होत नसतील अश्या आजारांनी त्यांना ग्रासले. पार्किन्सन ने त्यांच्या मेंदूचा ताबा जो घेतला तो शेवटपर्यंत. कोणाला होत नाही, ऐकिवात नाही असा नारू रोग सुद्धा त्यांना झालेला. हे सर्व पाहून आजोबांनी त्यांचं लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आजीच्या मनावर पडलेला आणखीन एक घाला!! इथूनच आजीच्या त्यागाची, कमिटमेंट ची सुरुवात होते. आजीने ही सगळी आजारपणं हसत हसत काढली. स्वतःच्या मुलीच्या लग्नात काकांना डॉक्टरांकडे घेऊन गेलीये ती. हे सर्व होत होतं आमच्या गिरगाव च्या २२५ स्क्वेअर फुटाच्या खोलीत. १९४२ ते १९९९ !!! आजी गिरगाव जगली.

घर सांभाळता सांभाळता तिने वाचनाची आवड कधी सोडली नाही. कोण जाणे कदाचित त्यातून तिला काहीकाळ मुक्ती मिळत असेल? आजीचं वाचन इतकं होत की मुंबई मराठी ग्रंथालयाने आजीला आजीवन सभासद करून घेतले होते. ग्रंथालयातील सर्व पुस्तके वाचून झाली की हे सभासदपद मिळते!! आजोबांनी सुद्धा आजीच्या वाचनाला प्रोत्साहनच दिले. त्यांनी तर आजीला इंग्रजी भाषा सुद्धा शिकवायला सुरू केलेली. पप्पा सांगतात एकदा पाणी भरत असताना आजी अचानक पुटपुटली "Two fellows are coming". हे ऐकून मी मात्र उडालोच.

४ मुलांची लग्न झाली. सर्व आपल्या संसारात रमले. त्यांना सुद्धा मुलं झाली. आजीच मात्र आयुष्य अंगावर येणाऱ्या संकटांचे मैलाचे दगड व्हावेत असेच चालू होते. १९९५ साली आजोबा गेले. आमच्या तिर्थरूपांचा सर्वात मोठ्ठा आधार. आजी त्या दिवशी खूप शांत पणे झोपली!! आजोबा गेले अन त्याच्या काही दिवसांच्या अंतरातच आमची गिरगाव ची राहती इमारत आम्ही तिथे राहत असतानाच कोसळली!!!! इथूनच आजीच्या अन आमच्या आयुष्याची अजून एक सुरुवात झाली!!
त्या जगन्मातेस सलाम!!!🙏🙏🙏
पंकज कानडे!!
युगांत!! भाग-२ समाप्त.

Monday, October 15, 2018

युगांत!! भाग -१


इतिहासात जोडले गेले सुवर्ण पान आज.
तुझ्या आगमनाने उजळून निघाले स्वर्गस्थान आज!

कुठून सुरुवात करू? आज माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी, माझी ताकद, माझे सर्वस्व, जिच्या भोवती माझे आयुष्य गुंफले गेले होते ती माझी आजी देवाघरी गेली. कायमची. सर्वांना सोडून. आज ९५ वर्षांच्या इतिहासाला पूर्वविराम मिळाला. एक तप संपलं. त्याग, कष्ट सारे सारे संपले.

इंदिरा बाबुराव कानडे! या नावानेच माझे आयुष्य विणले गेले आहे.
आजीबद्दल लिहायचं म्हणजे माझ्यासारख्या फाटक्या लेखकाला एका लेखात ते विश्व समावणं शक्य नाही. म्हणून आज भाग-१ लिहायला चालू केलाय. अजून किती होतील माहीत नाही.

देवाने खूपच कृपा केली माझ्यावर. देवरूपी आई बाबा दिले. आणि त्यांची आई म्हणजे माझी आजी. प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. त्यागाची अखंड तेवत असलेली ज्योत. ज्ञानाची, कर्तृत्वाची अखंड पेटती मशाल. जगात काय आहे जे तिच्याकडे नव्हते? मराठी भाषेतील तिचे ज्ञान पाहुन कुठल्याही विद्यापीठाने तिला पी.एच. डी. सहज दिली असती. तिच्या त्यागाबद्दल मी लिहिणे म्हणजे सूर्याचं तेज किती हे काजव्याने सांगण्यासारखं असेल. ते अनुभवायला तिचा सहवासच हवा. तिच्या प्रेमाची किती कीर्ती गाऊ मी? ते मी करणं म्हणजे माझ्यासारख्या कस्पटासमान माणसाने तिचा महिमा सांगणं होईल. ते सुद्धा ज्यांनी अनुभवलं तेच जाणतात. एक संपूर्ण व्यक्तिमत्व. काय आहे आयुष्यात जे तिने पाहिलं नाही? 

आजी ने तिचा जीवनपट माझ्यासमोर जेव्हा मांडला तेंव्हा कळले अरे कोणासोबत आपण राहतोय गेली इतकी वर्षे? या बाई ला एक टक्का सुद्धा माज, गर्व कधी शिवला नाही. इतकं ज्ञान, आयुष्यात इतका पैसा पहिला. इतकी गरिबी अनुभवली तरी तिच्या प्रेमात, त्यागात, स्वभावातील ओलाव्यात कसा खंड पडला नाही? हे मानव रुपात देव वास्तव्य तर करत होते का? आजी म्हटलं की मला कोण जाणे भगवद्गीताच आठवते. तिला आयुष्यच कोडं किती सहज समजलंय. जग ताकदीने नाही प्रेमाने जिंकता येते हे तिच्याकडेच पाहुन कळले. आपले वाईट करणाऱ्या, वाईट चिंताणाऱ्या व्यक्तीबद्दल सुद्धा ती कधी वाईट बोलली नाही.
आजी जसा जसा तिचा जीवनपट मांडू लागायची तसे माझ्या डोळ्यांतून अश्रूधाराच वाहायच्या. सुरुवात केली तिने तिच्या नाशिक येथील येवला येथील तिच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीपासून. अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेल्या पण बुद्धीने कुशाग्र असलेल्या माझ्या आजोबांशी म्हणजे तेव्हा वकिलीचा अभ्यास करणाऱ्या बाबुराव शंकर भगुंडे यांच्याशी..साल होते १९३९. आजोबांनी नंतर आमचे आडनाव भगुंडे काढून कानडे असे केले.

रायगड मधली महाड जवळ रावढळ या खेड्यात वास्तव्यात असताना १६ वर्षाच्या इंदू चा विवाह माझ्या आजोबांशी झालेला. रायगड ची इंदू नाशिक ला दिली. तिला तिघे भाऊ होते. तिघांची ही ती लाडकी धाकटी बहीण. आजी सांगायची माझ्या भावांनी त्या काळात आपल्या बहिणीला इतक्या लांब लग्न लावून दिले काय वाटले असेल त्यांना? आजी म्हणायची, हे तुमच्यासारखे आजचे मोबाईल नव्हते तेव्हा. पत्र सुद्धा पाठवता येत नव्हते. आजी सांगायची तिच्या लग्नात भाऊ खूप रडले. इंदू नाशिकला येऊन संसार करू लागली.

आजीच्या आयुष्याचे एक एक पान जसे तिच्याकडून ऐकत होतो तसे आपण किती निरर्थक गोष्टींवरून आयुष्यात निराश होतो हे मनोमन जाणवले आणि अर्थातच नेहमीप्रमाणे स्वतःचीच लाज वाटली. तिचं पहिलं मूळ जन्मताच दगावलं. विहिरीला पाणी भरायला गेली असता तिने कधी बाळाला जन्म दिला तिलाच कळलं नाही. शुद्धीवर आली तेव्हा बाळ जन्माला आलेल. १६ वर्षाच्या इंदूने बाळाशी तिची जोडलेली नाळ तेव्हा दगडाने ठेचुन वेगळी केली अन बाळाला घरी आणलं. तो पर्यंत खेळ खलास झालेला. त्या दुःखाची आठवण होऊन वयाच्या ९३ व्या वर्षी ही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहिलेत मी. हे प्रेम, जिव्हाळा ना किती ही श्रीमंत झालो तरी अनुभवताना येणार नाही. देवाचे आभार त्याने या देवीच्या सानिध्यात मला ठेवले. येवल्याला असताना भयंकर गरिबीत आजोबांनी शिक्षण घेतले.आमच्या आजी ने  त्यागाची परिसीमा गाठत कोवळ्या वयात संसार करायला सुरुवात केली. आजोबा नाशिकातून वकिलाच्या परीक्षेत पहिले आले अन मुंबई ला आले. साल होते १९४२.

आजी , जिचं स्वतःच गाव मुंबई होतं, ती मुंबईला आली.
मी अवाकच झालो ऐकून. आजीचं बालपण रायगड जिल्ह्यातील रावढळ या एका अगदी खेड्यातून खेडेगावात गेले. तिचं गाव मुंबई कसं काय? आजीची आई मुंबई, भायखळा इथली. रावढळ येथे अत्यंत सुस्थितीत राहिलेली आजी माझी लहानपणी. घरी दूध, तूप भरपूर. इतकं की गरिबांना अनेकदा फुकट वाटलं आहे त्यांनी . आजीचा हा किस्सा ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. आम्ही आयुष्यात पिशवीतल्या दुधाशिवाय दुसरं दूध पाहिलं नाही. कढलेलं तूप तर स्वप्नवतच. आजी गावी राहिलेली जरी असली तरी त्यांच कुटुंब खूप पुढच्या विचारांचं होतं. आजीची लहानपणी तब्येत बरी नसे. म्हणून आम्हा लिंगायतांच्या म्हणजे कडक शाकाहार करणाऱ्यांच्या घरात आजी तब्येतीची उकडलेली अंडी सुद्धा खायची. आताच्या जगातील आपल्याला तो निर्णय तेव्हाच्या काळात किती कठीण होतं ते कळणार नाही. मी जवळजवळ ९०-१०० वर्षांपूर्वीच बोलतोय. आजीचं बालपण सुखात गेलं.

तिचा तिच्या थोरल्या बंधूंवर म्हणजेच खंडाप्पा राजमानेंवर खूप जीव. आणि खंडाप्पांचा सुद्धा इंदूवर. आजीचा इतका जीव की वयाच्या ९३ व्या वर्षी अंथरुणात खिळलेली असताना सुद्धा, स्मृती जाऊन सुद्धा तिच्या मुखी अप्पा..अप्पा हेच ऐकलंय मी. अप्पा जिथे कुठे असतील तेव्हा बहिणीच्या प्रेमाने कृत्यकृत्य झाले असतील हे नक्की. त्या जगन्मातेस कोटी कोटी प्रणाम!! 🙏🙏🙏🙏
पंकज कानडे!!
भाग -१ समाप्त!!!

Friday, July 27, 2018

देख मराठी!! सोच मराठी!!!

आंदोलन, आरक्षण या बाबत लिहावे तितके कमी आहे..जेव्हा अख्खी पिढी वाचन विचारापासून, विज्ञानापासून दूर जाऊन अरक्षणासारख्या कुबड्यांसाठी "शूर वीर" वगैरे असल्याचं दाखवून स्वतःच्या वेळेची नासाडी करते तेव्हा सुजाण, प्रगत महाराष्ट्र ही फक्त एक भंपक कल्पना वाटते!
ब्राह्मणांनी पूर्वी अत्याचार केले म्हणून त्यांचा आकस आता धरणे योग्य नाही. ते त्यांचं आयुष्य जगतायत आपण आपलं. शिवरायांनी स्वराज्य उभं करायला कोणाकडे जमीन, शिपाई , सैनिक , सरदार मागितले नाही. त्यांनी ज्या पुण्यात दुष्काळ पसरला होता तिथे सोन्याची पिकं उगवली. सैनिक मागवून घेण्यापेक्ष्या स्वतःच्या घामाने मावळे घडवले. स्वराज्यासाठी आंदण म्हणून जमिनी मागण्यापेक्षा डोंगराच्या छातीवर किल्ले बांधले. लोकं ज्याला "पहाडोंक चुहा" म्हणायचे तो सह्याद्रीचा, महाराष्ट्राचा, भरतवर्षाचा अन हिंदवी स्वराज्याचा राजा झाला. त्या कष्टाची फळं आपण अजून ही भोगतोय.
२०० वर्षापुर्वी कोणी कसे अत्याचार केले त्याचा आताच्या जगाशी काहीही संबंध नाही. इंग्रजांनी किती अत्याचार केले, नोकरी मिळाली तर किती जण नाही म्हणतील इंग्लंड ला जायला?? आता जातीवाचक अत्याचार तर सोडाच पण तसा विचार जरी मनात केला तरी अटक होईल की काय अशी परिस्थिती आहे. राजकीय स्वार्थापायी राजकारण्यांनी मराठी जनतेमध्ये अजून एक फूट पडली आहे. कळतच  नाहीये कोण कोणाच्या विरोधात आहे. दलित विरुद्ध मराठा? ब्राह्मण विरुद्ध मराठा? की ब्रह्मन् विरुद्ध दलित?
स्वार्थापायी अन हव्यासापायी या जुलमी सरकार ने स्वार्थाची अन हव्यासाची सवय जनतेला सुद्धा लावली आहे. जातीपतीचं, धर्मद्वेषाचं विष त्या समाजात पसरवणे सर्वात सोप्पं. ज्ञानेश्वर महाराजांनी  सर्व जातीपातीच्या लोकांना घेऊन १३ व्या शतकातच दिंडी काढली होती. शिवरायांनी जातीपातीचे बंधन पाळले असते तर आज जातीवर मूर्खासारखे लढण्यासाठी आपण हिंदू तरी राहिलो असतो का??
अन आरक्षणाने कोपर्डी सारख्या बलात्काराच्या घटना कश्या थांबतील हे मला अजून ही एकाही आंदोलकाने सांगितलेलं नाही. त्यांना हा प्रश्न आवडत नसावा.
आंबेडकरांनी तेव्हा जे केलं ते योग्य होतं, बाळासाहेबांनी जे केलं ते योग्य होतं. त्या त्या नेत्यांनी तेव्हाच्या परिस्थितीला उपाय म्हणून पाऊलं उचलली.
असल्या लाफडयां मध्ये पडून, मोर्चे, घोषणा देऊन अनेक मराठी पिढ्या बरबाद झाल्या!! तरीही आपले डोळे उघडत नाहीत. मुंबई नावापुरती आपली राहिलीय. सर्व मलाई घेऊन गेले परप्रांतीय.
जो पर्यंत आपण राजकीय नेत्यांकडे आशाळभूत पणे आपल्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी पाहत राहू तो पर्यंत सर्वानाशच हाती लागेल.
आरक्षणासाठी आत्महत्या जेव्हा लोक करतात तेव्हा हसावं की रडावं तेच कळत नाही. मृतांच्या चितेवर राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या अन त्या पचल्या सुद्धा.
पाठी राहिलेत ते कोपर्डी येथील बलात्कार अन हत्याकांडात मृत्यू पावलेल्या लहान मुलीच्या पालकांच्या अश्रूंचा अन जखमांच्या ओलावा.
पंकज कानडे

Friday, March 2, 2018

Tamasha!!!

Tamasha!!!
Hate to see these "mad for money" businessmen , stretch to any length to loot the country. When will these guys understand money isn't everything? What is he going to take away while on death bed?
This is "gang" of particular businessmen supported, backed, shielded by the current government. I dont know what "common interests"/"common threads" these businessmen and current government share for them to have such a courage and liking by later for former.
Previous government was 100% corrupt and hence people voted to current one, beliving this man wont get his hands dirty in politics. He wont get involved in revenge politics. He wont use the "system" to benefit the quoted businessmen. He will be answerable to people as he himself mentioned during his pre-election rallies. He will be a "choukidar" of country's "tijori". He will reply terrorist harboring country "in its own language".He will build houses for people, create jobs for people.
Well what has happened in past 3 and half years is exactly ironical.
He is India's elected leader and has ignored or rather dismissed public openion and the real problem, pursuing his imagination or his personal dream of the country and almost dragin every contrymen along with him.
Someone who was supposed to answer to questions of countrymen has gone deaf to them. Someone who was supposed to guard the "tijori" has gone blind to them. Someone who was supposed to answer for people of india to terrorist nation "in its own language" has gone mute to them and now is a  promoter of peaceful talk. Someone who was supposed to build homes for people, has built home to his party worth whopping ₹800 crores.
Someone who promised jobs asked people to create their own source of income by selling pakoda. Well...the jobs were for those who needed them. If needy was strong enough to get self employed,he wouldn't have voted for you.
There are people who advocate the hypocrisy and lies of government by saying the government is still in infancy, We must give them time?? We have already given 4 years. All we have seen in these four years is thousands of crores of money outfluxed from country for never to return.Infant government wont execute "demonetization". Infant government wont execute GST. If it was infant government with pure intent , it would have first wiped out the fungus of corruption in government system.
 When after comfortably winning election the running government party says , promise to deposite 15lakhs in everyone's bank account was just a election gimmick then you must realised, everyone in this bath tub is naked. And yes we have already forgotten black money issue.
By next year, equal or may be more amount of money will go out of country by hands of wilful loan defaulters, thanks to the government which is sleeping on bean bag(or money bag may be?)
Rather than making people run from pillar to post for linking their adhar card to every document of their life, they should have linked aadhar with voting card but they wont do this and we know why. Rather than making laws for 2% tax paying population of country and adding to their misery, government should have planned "proactively' to catch the big fishes like mallyas and modis (wait, dont get angry. M talking about lalit and neerav). That would have happened if they had an intention of doing so. Loan defaulters have fled the country right under governments nose.
But should we expect from a government which spends more time, money and energy in winning elections everywhere?
I leave that judgement to every sensible indian.
Happy Holi!!!
Pankaj Kanade

Friday, January 26, 2018

De-javu



Heartfelt letter to #AjinkyaRahane

Someone is digging life out of grave, someone is riding on a bull, somone is swimming against the tide, somone is fighting with the fire, someone is bringing back career to life of out death that too on #Johonusburg
Ajinkya Rahane I am keeping my article on you in my Draft. Make me post it.

Tight Collar, shuffling around the wicket at non-striker end, intense eyes while batting, determined face and some classic text book cricket attack. 5 fearsome boundaries, attacking from GO, you look determined as I write shuffling my eyes between television and handset.

You pad up every where on your body and only place you get hit is your elbow where you aren't padded.

Destiny took your words way too seriously brother when you said "2018 is going to be my year". These "my years" are usually like gold, you ought to go through fire first to come out shining later.

Climax, anti-climax, low patch against most mediocre bowling, fathers police arrest, flying to africa as vice captain and then getting dropped for first 2 tests...almost everything working against you. But brother, these are the exact ingredients that work together to success. You have toiled hard to reach here and so did you to make your mark. Destiny is with those who never give up on themselves first. Destiny helps those who help themselves. You are certainly one of them. You took one innings in green top wicket to come back to form while others took entire series to maintain their "top" (pata wicket though, I can say flat pitches here but that would be understatement) batsmen image and failed.

You are once again caught up in unimaginable, unthinkable scenario and I believe everyone is expecting you to fail. The De-javu of Lords heroics might come back here as I see you today like lords fighting it out along with bhuvaneshwar kumar.
Make it count brother. Make it count. Path is never easy for most selfless individuals on earth but these are very paths which lead to glory. You are already halfway through. Make the other half yours. Make us proud as you always did.
Best wishes.
Pankaj Kanade