Friday, September 10, 2010

आईचं छत्र हरवलं!!

आईचं छत्र हरवलं,
ती गेल्यावर ते कळलं,
तिचं बोट धरून,
तिने चालायला शिकवलं,
त्याच मुलाला सोडून जाताना,
तुला काहीच कसं नाही वाटलं?
आईचं छत्र हरवलं,
ती गेल्यावर ते कळलं,

तुझ्या शिवाय कसं जगू
काय सांगू आई...
ज्याला तू जन्म दिलास,
त्यालाच सोडताना एवढी घाई..
जीचं बोट धरून चाललो,
आज तिलाच खांद्यावर न्यावं लागलं,
आईचं छत्र हरवलं,
ती गेल्यावर ते कळलं,



तिने केलेल्या संस्कारांनी,
घराला घरपण आलं होतं,
स्वतः तर झिझून गेली,
आम्हाला मात्र पंखाखाली ठेवलं होतं,
तिच्यासाठी उभारलेलं वैभव
आता कौडीमोल वाटलं,
आईचं छत्र हरवलं,
ती गेल्यावर ते कळलं,

अश्रूंना कसं थांबवु आई,
तूच त्यांना नेहमी सावरलं होतस,
तुझ्या पश्चात त्यांना,
फक्त वाहणच माहीत होतं,
बोलायला फक्त मी होतो,
ऐकायला मात्र कुणीच नव्हतं,
आईचं छत्र हरवलं,
ती गेल्यावर ते कळलं................................हृदयस्पंदन

Thursday, February 18, 2010

भगवे कट्टर!!

भगवे कट्टर!!

आता पुन्हा नव्या घोषणा,
डावपेच पुन्हा नवा,
श्वासतून येई एकाच आवाज,
भगवा भगवा!!

हिंदूंचा तो रक्षण कर्ता,
गरीबांचा तो वाली,
मरहठ्ठ्यांना एकत्र आणले,
भगव्या छत्राखाली...

खूप केले त्याने आपल्यासाठी,
पाळी आपली आता,
टाच टाकूनी येवू पुढे,
पाहू विरोधी शत्रू कोणता..

घेवूनी येवू नव्या कल्पना,
नवनव्या माध्यमाने,
परक्यांचा हि बिमोड करू..
गनिमी काव्याने...

बेंबीच्या देठापासून देवू
पुकार हिंदुत्वाचा
एकजुटीने सुरात गावू
जयजयकार महाराष्ट्राचा!!!
.....................................पंकज कानडे.

Monday, January 25, 2010

Faded Memories

Faded Memories!!!

Memories were dangling,

From one end to another,

Like branches of trees,

Along with wind & Bird’s feather…


Word’s won’t be enough,

I knew that earlier,

If I have to convey my love,

I will have to shade away my fear…


In this chaos of feeling,

I was shaky but still,

My love remained untold,

Though I had deepest will…


She went away as,

NO CONFESSION was my crime,

I stood hopelessly with no clue,

As, I had just lost my time…


May be,she remained silent,

For me, to break the ice,

I was just foolish statue,

Fearing to throw final dice…


Enough was all that,

She showed me her back,

Book of love was unopened,

Which, later I had to pack…


I had patience….dear,

Waited for three years,

Just a month late was I,

Finally shaded some tears………

Pankaj Ulhas Kanade

21/01/2010.