Sunday, July 26, 2026

जय हिंद!! जय महाराष्ट्र!! जय भीम!!

देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठी शिवरायांनी इच्छा नसताना स्वराज्यासाठी स्वराज्याभिषेक केलाय.

ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण विश्वाची काळजी करणारे पसायदान लिहिले. संत तुकारामांनी समाजाच्या दुटप्पी वागणुकीवर, जातीव्यवस्थेवर, अंधश्रद्धेवर अंकुश ठेवणारे अभंग लिहिले.

हिंदी हिंदू हिंदुत्व च्या पूढे जाणारं महाराष्ट्राचं हिंदुत्व आहे..ह्या भूमीत जसा मराठ्यांचा इतिहास आहे तसंच ही भूमी बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाली आहे. इथे RSS चा उदय झालाय, त्याच भूमीत डॉ. नरेंद्र दाभोळकर होऊन गेले. इथे प्रबोधनकार ठाकरे पाहिले, संत तुकाराम, आचार्य अत्रे, पुलं देशपांडे पाहिले. संत ज्ञानेश्वरांनी ८०० वर्षांपूर्वी जातीच्या बांधनाना झुगारून अभूतपूर्व सर्व जातीसमावेशक दिंडी काढली.  गेल्या ४०० वर्षांचा इतिहास पहा विविधतेने नटलेल्या ह्या भूमीने देशाला अनेक नेते दिलेत ज्यांनी देशाला नवी दिशा दिली.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥ 

ह्या भगवतगीतेतल्या ओळी महाराष्ट्र जगला आहे.

त्यातलाच नवा चेहरा म्हणजे दलित समाजातून समाजाच्या सर्व जातीच्या बांधनाना झुगारून वर आलेला, जय भीम चा बुलंद नारा देत वर आलेला अभिजित दिपके!! कारण जेव्हा बाकीची राज्य महाराष्ट्रावर कुरघोडी करत महाराष्ट्राचा चावा घेत असतात तेव्हा महाराष्ट्र नेहमीच देशाची काळजी करत असतो. दिल्लीत आदिलशहा असो, निजामशहा, कुतुबशहा, शहेनशहा असो किव्हा आताच हुकूमशहा असो..ह्यासर्वांचे माज एकट्या महाराष्ट्राने उतरवले आहेत.

आज जुलमी हुकूमशाही विरोधात पहिला लढा जिंकलो आहोत. पण ही लढाई आता सुरू झाली आहे. हुकूमशहा हुशार आहे, धूर्त आहे, कपटी आहे. तुम्हाला आयुष्यातून उठवायला पूर्ण तयारी निशी मैदानात उतरला आहे. तो थोडा बेफिकीर झाला म्हणून ही लढाई हरला पण पुन्हा पुढची लढाई तो हरेल अश्या संभ्रमात आपण राहू नये.

आज तो 2 पाऊल मागे आला आहे. ह्या विजयातून प्रेरणा नक्कीच मिळाली आहे. हुकूमशहा विरोधात उभे राहायला अनेकांना बळ मिळाले आहे. पण लढाई संपलेली नाही ती आता कुठे सुरू झाली आहे.

अंधभक्तांना पुन्हा पुन्हा मी हेच सांगेन, भाजपचा वरवंटा देशावर फिरायला सुरुवात झाली आहे. त्यात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा भरडले जाणार ह्यात शंका नाही.

आज E20 पेट्रोल मुळे बेफिकीर सरकार ने केलेला भ्रष्टाचार जसा आमच्या घरी पोहोचला आहे तसाच तो तुमच्या घरी ही पोहोचला आहे. भक्तांना, RSS च्या स्वयंसेवकांना भाजपच्या सर्वार्थाने अर्थहीन राजकारणातून सुट्टी नाही.

त्यामुळे ह्यापुढे आजून भ्रमनिरास होण्याआधी जागे व्हा. पक्ष कुठला ही असो. त्यांना जाब विचारा. व्यक्तिपूजेने आपल्या देशाला इथवर आणून सोडलंय. भाजप जाईल ही उद्या सत्तेतून पण ह्या सरकार ने केलेलं जनतेचं नुकसान भरून काढायला फार फार वेळ लागणार आहे.

आजच्या लढ्याने जय भीम चा नारा पुनर्रीजीवीत केला आहे. ह्या लढ्याने निखिल वागळेंसारख्या अनुभवी पत्रकाराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणले. ह्या लढ्याने ठाकरेंना सुद्धा झेंड्याशिवाय, पक्षाशिवाय समर्थन द्यायला भाग पाडले आहे. वागळेंनी सांगितल्याप्रमाणेच जय भीम चा नारा हा काही बौद्ध समाजाचा नारा म्हणून उरलेला नाहीये तो कधीच नव्हता. जय भीम चा नारा हा समतेचा नारा आहे, न्यायाचा नारा आहे, अन्यायाच्या विरोधात लढायछा नारा आहे, सर्वसमावेशकतेचा नारा आहे. ज्याचा उदय महाराष्ट्राच्या मातीत झाला आहे.

आणि म्हणून जो पर्यंत महाराष्ट्र आहे, तो पर्यंत देशाला वाचवायला तो पुढे येतंच राहील.

जय हिंद!! जय महाराष्ट्र!! जय भीम!!

पंकज कानडे

Saturday, January 24, 2026

Maharashtra's funeral pyre!!

 If I despite being atleast an average writer, don't write against the tyrannical regime of BJP or all the rulers in Delhi who are out to destroy the Marathi language, or rather, Maharashtra the identity of my state...

If, even today, seeing the devaluation of the surrounding social and traditional circumstances, our pen doesn't flare up...

Seeing my marathi fellow men with a DNA that revolts against injustice, so misguided that they are now conspiring against their own Marathi culture...

If we remain silent and ignore it, and keep deluding ourselves into believing that the monster called BJP is not a monster but an angel...a sinner in the mask of savior!!!

Wouldn't that be considered highest form betrayal of our mother tongue, Marathi, the language we received from our mother's milk?

There is no greater misfortune than the fact that the number one Marathi-hating party in the country is receiving protection in Maharashtra. And the Marathi brothers who are rushing to defend them are so deeply immersed in their love for that party that they don't even realize that they are contributing to the destruction of their mother-like Marathi land for the very party which is building its castle on the funeral pyre of maharashtra?

Why don't we evaluate political parties based on principles?

It would have be only surprising if the venom that BJP carries and its foot soldiers who spew hatred for abandoning Hindutva, and the blind followers who beat the drum for the BJP without any regard for consequences or rational thought, hadn't affected the Shiv Sena, the real Shivsena.

The Shiv Sena has consistently taken positions that are supportive of Marathi or the state of Maharashtra. Even during Balasaheb's time, the Shiv Sena and Balasaheb himself supported the Congress for Pratibha Patil's presidential candidacy – that is history.

And shouldn't those who beat the drum for the BJP see that the cunning Fadnavis is enjoying the fruits of power by sitting with the very people he campaigned against, calling them corrupt? Where did your Hindutva go now? You put them in jail, and then you released them from jail and put them in power... some were even made Chief Ministers. Those who don't understand even after seeing all this are the blind followers, aren't they? And the BJP's agenda is that Hindutva means only the existence of Hindi.  In their definition of Hindutva, there is no place for the Marathi language or any language from South India. Even knowing this, the blind followers of this ideology, more than the political party itself, will be responsible for the permanent damage to the country by falling into the trap of this false concept of Hindutva.

And most importantly, when the BJP's steamroller runs over the country, everyone, including these blind followers, will be crushed under it.

Their plan is to corrupt the Indian judiciary, dismantle the constitution, seize control of the country's autonomous institutions, use central power and money to harass opposition leaders, and somehow grab power.

And then to praise themselves as the sole saviors... There is no greater example of narrow-minded intelligence for someone who calls himself a Chanakya!

There is no other party that wears the crown of eternal power on its head, leaves everything else exposed, roams around naked everywhere, and yet preaches the philosophy of patriotism to the people.

They criticize Pakistan for injustice, forced conversions, and atrocities against its minority communities, and then behave exactly the same way here. Handing over all the country's industries to a single businessman, imposing the language of Delhi's rulers on Maharashtra despite the linguistic reorganization of states, and then our own Chief Minister and his non-Marathi companions building the pyre of our own language and state – as if this wasn't enough, we have our own Marathi people happily carrying the urn of ashes of our state to the crematorium!!

To be continued!!!

Pankaj Kanade!!!

Friday, January 23, 2026

महाराष्ट्राची तिरडी बांधलीये!!

 मराठी भाषेची किंबहुना महाराष्ट्राची तिरडी बांधायला निघालेल्या भाजप अथवा समस्त दिल्लीश्वरांविरोधात जर लिहिले नाही..

जर आज ही आजूबाजूच्या सामाजिक, पारंपरिक परिस्थितिचे अवमूल्यन होताना पाहून सुद्धा आपली लेखणी चवताळली नाही...

अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा DNA असणाऱ्या माणसाला असं भरकटलेलं, आपल्याच मराठी संस्कृती विरुद्ध कारस्थाने करताना पाहून..

आपण शांत बसून दुर्लक्ष करून..समोर असलेला भाजप नावाचा राक्षस हा राक्षस नाही तर देवदूत आहे ह्या भ्रमात स्वतःला समजावत राहिलो...

तर आपल्या मायमराठी शी आपल्या आईच्या दुधातून मिळालेल्या भाषेशी केलेली ती गद्दारी ठरणार नाही का?

देशात असलेला 1 नंबर चा मराठी द्वेषी पक्षास महाराष्ट्रात अभय मिळावे या सारखे दुसरे दुर्दैव नाही..आणि त्यांची वकिली करण्यास सरसावत असलेले मराठी भैये जे त्या पक्षाच्या प्रेमात इतकं आकंठ बुडालेत की आपण आपल्या मातेसमान आईला आपल्या मराठी भूमीला सुद्धा उध्वस्त करणाऱ्यास हातभार लावतोय हे सुद्धा कळू नये?

का आपण तत्वांच्या आधारावर राजकीय पक्षाचे मूल्यांकन करत नाही?

हिंदुत्व सोडलं म्हणून गरळ ओकणारे भाजपीय अन जराही तमा न बाळगता अन सारासार विचार न करता भाजपचा ढोल बडवणारे अंधभक्त ह्यांच्या विषाचा सेनेवर फरक पडला नसता तरच नवल.

सेनेनं वेळोवेळी मराठी किंवा महाराष्ट्र राज्यास पूरक भूमिका घेतली आहे. अगदी बाळासाहेब असताना सुद्धा प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदा करिता सेनेनं बाळासाहेबांनी, काँग्रेस ला पाठिंबा दिलाय हा इतिहास आहे.

आणि भाजपचा ढोल बडवणाऱ्याना सुद्धा हे दिसू नये की धूर्त फडणवीसांनी ज्यांना भ्रष्ट म्हणून उर बडवून प्रचार केला त्यांच्याच साथीला बसून सत्तेचा मेवा खातायत..आता तुमचं हिंदुत्व कुठल्या शेपटीत घातलं? ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं त्यांनाच तुम्ही तुरुंगातून बाहेर काढून सत्तेत बसवलं..काहींना तर मुख्यमंत्री सुद्धा बनवलं. हे दिसुन ही ज्यांना कळत नाही तेच तर अंधभक्त आहेत ना?

आणि हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदीचेच अस्तित्व हाच भाजप चा डाव आहे..ह्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत मराठी भाषेला अथवा दक्षिणेतल्या कुठल्याच भाषेला स्थान नाही..हे माहीत असून सुद्धा हिंदुत्ववादाच्या खोट्या संकल्पनेत अडकून देशाचे कायमचे नुकसान करण्यास राजकीय पक्षापेक्षा त्यांचे अंधभक्तच जबाबदार असतील..

आणि मुख्य म्हणजे जेव्हा भाजपचा वरवंटा देशावर फिरेल तेव्हा सर्वांसकट अंधभक्त सुद्धा त्यात गाडले जातील..

भारतीय न्यायव्यवस्था नासडून, संविधान कोलमडून, देशाच्या स्वाययत्त संस्था हाताशी घेऊन, केंद्रीय सत्ता अन पैसा हाताशी घेऊन विरोधी पक्ष नेत्यांना त्रास देऊन कशी ही सत्ता ओरबाडून घ्यायची अन 

स्वतःला एक अकेला म्हणून वाह वाह करून घ्यायची.. स्वतःच स्वतःला चाणक्य म्हणनवुन घेण्यासारखं दुसर संकुचीत बुद्धिमान नाही!!

सत्तेचा अमरपट्टा डोक्याला लावून खालचं सगळं उघडं सोडून सगळीकडे नागडं फिरून लोकांना देशभक्तीचं तत्वज्ञान शिकवणारा दुसरा पक्ष ही नाही..

ज्या पाकिस्तानवर तेथील अल्पसंख्याक समाजावर अन्याय, धर्मांतर, अत्याचार करतात म्हणून टीकास्त्र सोडायच अन आपण ही इथे तसेच वागायचे. देशातील सारे उद्योगधंदे एकाच व्यापाऱ्याच्या हातात द्यायचे, भाषिक प्रांतरचना असून ही दिल्लीश्वरांची भाषा महाराष्ट्रवर लादणाऱ्या, आपल्याच भाषेची आपल्याच राज्याची तिरडी बांधणारा आपला मुख्यमंत्री अन त्याच्या साथीला असलेले परप्रांतीय खांदेकरी हे कमी होते का काय तर पुढे आपल्या राज्याची राख करून त्याचं मडकं पकडून आनंदाने स्मशानभूमीत नेत असलेला आपलाच मराठी माणूस !!


पुढील भाग लवकरच!!!

पंकज कानडे!!!