Tuesday, April 9, 2019

मोदी विरुद्ध गांधी..एक खोटा सामना!! भाग-१

अटल बिहार वायपेयींचं संसदेतील गाजलेल्या भाषणांपैकी एक भाषणात ते असं म्हणतात,"सत्ता आयेगी जयेगी, लेकीन देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए" आजच्या भाजपला हे मूळ तत्वच मान्य नाहीये. जुनी भाजप ही आर.एस.एस. प्रणित होती..अनेकांची मते वेगवेगळी असतील पण आर.एस.एस. कडे संस्कार होते ते भाजपच्या सरकार चलनात दिसायचे. आणि त्यात संस्कारांचं प्रतीक म्हणजे भाजप कडून झालेले राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम.

मोदींना काहीही करून आधी सत्ता हवीय. काही लोकांना जमिनीवर पाय ठेऊन लोकसेवा करायची असते तर काहींना सर्व काही स्वतःकडे ठेवायची सवय असते फक्त हव्यास.. आजचे भाजप वाले दुसऱ्या गटात मोडतात.

आपला देश इतका महान आहे की एका चहावाल्या व्यक्ती ला ३ वेळा मुख्यमंत्री करू शकतो आणि १ वेळ प्रधानमंत्री करू शकतो..त्यामुळे देशाला मोदी किंवा गांधी मध्ये निवड करावी लागेल..किंवा मोदींशिवाय देशाला पर्याय काय? अश्या भंपक भाजपिय अफवांना सुरुंग लावा आता एकदाच.
ज्या देशाची लोकसंख्या १३५ कोटी आहे तिथे जर तुम्हाला वाटत असेल की देश चालवण्या लायक फक्त एक माणूस आहे तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे देशाची.

जिथे एका गरीबाचा मुलगा डॉ अब्दुल कलाम होऊ शकतो, एक गरीब घरातील मुलगी देशाची गानकोकिळा लता मंगेशकर होऊ शकते, जिथे मध्यमवर्गीय घरातील मुलगा देशाचा अन जगातील सर्वात मोठा क्रिकेटर सचिन तेंडुलकर होऊ शकतो तिथे त्या मातीत तुम्ही जर म्हणता की मोदींना पर्याय काय? तर मित्रानो तुमची मोदीभक्ती ही देशभक्ती वर पाय ठेऊन उभी आहे हे लक्षात घ्या.

ही भूमी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, मनोहर पर्रीकर, प्रकाश आमटे यांची भूमी आहे.मतितार्थ, तन मन हरपून देशासाठी कार्य करणाऱ्यांचीच भूमी आहे..आणि ही उदाहरणं आजच्या जगातील आहेत. त्यामुळे मोदींना पर्याय काय हे विचारताना स्वतःलाच एक चपराक मारून घ्या.

अहो मोदी विरुद्ध राहुल गांधी हा सामना नव्हताच कधी. एक धूर्त मुरलेला राजकारणी आणि एक बालिश लाडावलेला धनाढ्य घरातील बावळट मुलगा यात सामना कसा होऊ शकतो? तो सामना तुम्ही निर्माण केला..

हे म्हणजे हल्लीच भारतीय क्रिकेट संघाने सर्वात दुबळ्या ऑस्ट्रेलिया संघाला हरवून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. ते सुद्धा केले आपल्या संघाने. भाजप सुद्धा तेच करतेय.
काँग्रेसला हरवून मोठा तिर मारला नाही हो तुम्ही. मेलेल्याला मारण्यात कसली हुशारी?

राहूल गांधी ला पप्पू म्हणून(मी काँग्रेसी नाही, सो भक्तांनी लगेच मला काँग्रेसी , भारत विरोधी बोलू नये) आणि मग मोदींना पर्याय काय? राहुल गांधी? असे बावळट प्रश्न विचारून तुम्हीच मोदी आणि गांधी ला बाजूबाजूच्या पाटावर बसवलेत.

भक्तांना घरबसल्या देशभक्ती चं सर्टिफिकेट मिळाल्यासारखे वाटते स्वतःला मोदी भक्त म्हणवून घेताना. ही कसली शॉर्टकट मधली देशभक्ती? ही तर देहभक्ती!! अहो मोदी भक्त म्हणजे देश भक्त हे तुम्ही कोण ठरवणार?  आणि मोदी विरोधी म्हणजे "anti- national"? क्या बात! हे शॉर्टकट देशभक्त उर्फ मोदिभक्त तेच लोक आहेत जे देवळासमोरून जाताना बाहेरूनच निसटता चर्च मध्ये करतात तसे हातवारे करतात आणि निघून जातात...पाहिलेत का कधी हे शॉर्टकट भक्त?

राज ठाकरेंनी जेव्हा मोदींवर डबल बॅरल गन घेऊन पर्वा हल्ला केला तेव्हा भाजपवाले आणि आमचेच(दुर्दैवाने) स्वाभिमान भाड्याने घेणारे शिवसेनेवाले राज ठाकरेंना काँग्रेस चा भाडोत्री पक्ष म्हणतात तेव्हा हसू येते..कोण म्हणतात?? भाजप वाले ज्यांच्या पक्षात काँग्रेस मधलेच भाडोत्री उमेदवार आहेत ते!! आणि आमचे शिवसेनेचे वाघ जे भाजप समोर लोटांगण घालून युती करतात स्वाभिमान विसरून ते ही.

एक लक्षात ठेवा..ही मोदींची, सेनेची ,काँग्रेस ची वकिली बंद करा..उद्या अडचणीत आलात तर ह्यांच्या पैकी शाट्टा कोणी येत नाही मदतीला..मदतीला तेच येतील ज्यांच्या विरुद्ध कदाचित हे नेते तुम्हाला भडकवत असतील..

आणि हो जाता जाता..
कुठली ही अद्ययावत हत्यारे, कुठली ही सीमा, कुठला ही कायदा नसताना गेली जवळ जवळ हजारो वर्ष हिंदू धर्म अनेक आक्रमणानंतर सुद्धा जिवंत आहे १३५ कोटी जनतेच्या स्वरूपात. त्यामुळे आता देश धोक्यात आहे, हिंदू धोक्यात आहे असे म्हणणाऱ्यांना विचारा विकास कुठे गेला? आता जीएसटी, नोटिबंदी जी केली त्यावर मत का नाही मागत? अजून किती दशकं राम मंदिर या विषयावर मतं मागणार?

हे प्रश्न तुमच्या म्होरक्याना विचारा..तो पर्यंत माझा याच विषयावर दुसरा लेख येतोच आहे.

जय हिंद!

No comments:

Post a Comment