Monday, January 31, 2011

जिंकणार मी...

किती धावलो..किती धडपडलो..
तरी काहीच कसं होत नाही..
नोकरी तर सोडाच..साला
कोणी इंटरव्यूला हि बोलवत नाही..

डिग्र्या हातात घेऊन..ह्या नोकरी ने
वणवण भटकवलय मला.
चलपा झीजतात म्हणजे काय..
हे आज कळलंय मला..

किती सीव्ही मेल केले..
किती पोस्टाने पाठवले..
क्वालिफिकेशन ची ऐशितैशी..
ओळख नाही म्हणून धुडकावले..

रेफरन्स मागायला गेलो तेव्हा
परके-आपले कळले..
मदतीचे हात तर माझ्याकडे..
अनपेक्षितांकडून वळले..

देवाने ही मुद्दाम ठरवून
परीक्षाच मांडली आहे माझी..
त्याने किती ही ठरवल..तरी
जिंकणार मीच ही बाजी..
जिंकणार मीच ही बाजी..
जिंकणार मीच ही बाजी..