Thursday, February 9, 2012

कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..!!!!


कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..!!!!
.
.
.
.
शेती धान्यात मिळती खडे..
हो...हो..हो...हो......हो....................हो!!
शेती धान्यात मिळती खडे..
मराठी शाळाच बंद पडे..
भ्रष्ट्राचाराने महाराष्ट्राला तडे..
पैसा खाऊन ह्यांची पोट पुढे..
कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..
कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..!!!!
(अहो..कोणी हा महाराष्ट्र विकत घेता का..कॉंग्रेस ने वाट लावलेला महाराष्ट्र हा हिंदुस्थान कोणी विकत घेता..का..नाही??)


कलमाडी पवार राणे...
हो...हो..हो...हो......हो....................हो!!
कलमाडी पवार राणे...
इमानदारी ह्यांच्यातून उणे..
वाकती दिल्लीच्या बाई पुढे..
घोषणांचे नुसते बूडबुडे..
कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..
कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..
(बरं का लोक हो..ह्या दिल्लीवाल्यानी देशाची व्यवस्थितपणे वाट लावली आहे..त्यांचा निशाणी "हात" फक्त धुण्याच्या कामाचा आहे..त्यासाठी ही तो आधी धुवून घ्यावा लागेल)




२जी ३जी लिपी कॉँग्रेसकडे..
हो..हो..हो...हो........हो...हो..
२जी ३जी लिपी कॉँग्रेसकडे..
निघती वाभाडे..देशाच्या इज्जतीचे.
मनमोहनी कारभाराचे देती धडे..
मराठीचे ह्यांना जन्मापासून वावडे..
कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..
कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..
(ह्याना तरी का दोष द्या..आमच्या मराठी मुली..गुजरात्यांशी पंजाब्यांशी लग्न करण्यात धन्यता मानतात..त्याना त्यात कसली तरी घानेरडी फॅशन दिसते..हे तेच लोक आहेत जे मराठी जनतेला पाण्यात बघतात....)






आता आई भवानीलाच साकडे..
हो...हो..हो...हो......हो....................हो!!
आता आई भवानीलाच साकडे..
मागणे आहे आई तुझ्याकडे..
वेळ नाही देशासाठी ह्या हरामखोर नेत्यांकडे..
मजबूत कर गड बूझवून ताक तडे...
कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..
कॉँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र बिघडे..
(लक्षात ठेवा लोक हो..देशाची वाट लावणार्‍या कॉंग्रेस ला मुंबईची वाट लावायला किती से दिवस लागणार आहेत..तरी ही मुंबईकर सुखात आहे..जो काही आहे ते..स्वर्गसुख मी म्हणणार नाही..कारण ते स्वर्गात मिळतं..कॉंग्रेस ला मत द्याल तर तुम्हाला स्वर्गात जायची लवकर संधी मिळेल....साहेब आणि शिवसेना आहे म्हणून मुंबईकर सुखी आहे..कॉंग्रेस ला मत म्हणजे..वाट लागणे हे ठरलेले..)
पंकज कानडे..(हृदयस्पंदन)