आंदोलन, आरक्षण या बाबत लिहावे तितके कमी आहे..जेव्हा अख्खी पिढी वाचन विचारापासून, विज्ञानापासून दूर जाऊन अरक्षणासारख्या कुबड्यांसाठी "शूर वीर" वगैरे असल्याचं दाखवून स्वतःच्या वेळेची नासाडी करते तेव्हा सुजाण, प्रगत महाराष्ट्र ही फक्त एक भंपक कल्पना वाटते!
ब्राह्मणांनी पूर्वी अत्याचार केले म्हणून त्यांचा आकस आता धरणे योग्य नाही. ते त्यांचं आयुष्य जगतायत आपण आपलं. शिवरायांनी स्वराज्य उभं करायला कोणाकडे जमीन, शिपाई , सैनिक , सरदार मागितले नाही. त्यांनी ज्या पुण्यात दुष्काळ पसरला होता तिथे सोन्याची पिकं उगवली. सैनिक मागवून घेण्यापेक्ष्या स्वतःच्या घामाने मावळे घडवले. स्वराज्यासाठी आंदण म्हणून जमिनी मागण्यापेक्षा डोंगराच्या छातीवर किल्ले बांधले. लोकं ज्याला "पहाडोंक चुहा" म्हणायचे तो सह्याद्रीचा, महाराष्ट्राचा, भरतवर्षाचा अन हिंदवी स्वराज्याचा राजा झाला. त्या कष्टाची फळं आपण अजून ही भोगतोय.
२०० वर्षापुर्वी कोणी कसे अत्याचार केले त्याचा आताच्या जगाशी काहीही संबंध नाही. इंग्रजांनी किती अत्याचार केले, नोकरी मिळाली तर किती जण नाही म्हणतील इंग्लंड ला जायला?? आता जातीवाचक अत्याचार तर सोडाच पण तसा विचार जरी मनात केला तरी अटक होईल की काय अशी परिस्थिती आहे. राजकीय स्वार्थापायी राजकारण्यांनी मराठी जनतेमध्ये अजून एक फूट पडली आहे. कळतच नाहीये कोण कोणाच्या विरोधात आहे. दलित विरुद्ध मराठा? ब्राह्मण विरुद्ध मराठा? की ब्रह्मन् विरुद्ध दलित?
स्वार्थापायी अन हव्यासापायी या जुलमी सरकार ने स्वार्थाची अन हव्यासाची सवय जनतेला सुद्धा लावली आहे. जातीपतीचं, धर्मद्वेषाचं विष त्या समाजात पसरवणे सर्वात सोप्पं. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व जातीपातीच्या लोकांना घेऊन १३ व्या शतकातच दिंडी काढली होती. शिवरायांनी जातीपातीचे बंधन पाळले असते तर आज जातीवर मूर्खासारखे लढण्यासाठी आपण हिंदू तरी राहिलो असतो का??
अन आरक्षणाने कोपर्डी सारख्या बलात्काराच्या घटना कश्या थांबतील हे मला अजून ही एकाही आंदोलकाने सांगितलेलं नाही. त्यांना हा प्रश्न आवडत नसावा.
आंबेडकरांनी तेव्हा जे केलं ते योग्य होतं, बाळासाहेबांनी जे केलं ते योग्य होतं. त्या त्या नेत्यांनी तेव्हाच्या परिस्थितीला उपाय म्हणून पाऊलं उचलली.
असल्या लाफडयां मध्ये पडून, मोर्चे, घोषणा देऊन अनेक मराठी पिढ्या बरबाद झाल्या!! तरीही आपले डोळे उघडत नाहीत. मुंबई नावापुरती आपली राहिलीय. सर्व मलाई घेऊन गेले परप्रांतीय.
जो पर्यंत आपण राजकीय नेत्यांकडे आशाळभूत पणे आपल्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी पाहत राहू तो पर्यंत सर्वानाशच हाती लागेल.
आरक्षणासाठी आत्महत्या जेव्हा लोक करतात तेव्हा हसावं की रडावं तेच कळत नाही. मृतांच्या चितेवर राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या अन त्या पचल्या सुद्धा.
पाठी राहिलेत ते कोपर्डी येथील बलात्कार अन हत्याकांडात मृत्यू पावलेल्या लहान मुलीच्या पालकांच्या अश्रूंचा अन जखमांच्या ओलावा.
पंकज कानडे

Mast...
ReplyDelete