७० वर्ष देशाला कॅन्सर ची बाधा झालेली म्हणून आपण काँग्रेस ला लाथ मारून भाजप च्या हाती देशाची कमान दिली. सबका साथ सबका विकास नाऱ्याला देशाने आपलं मत भाजपच्या पारड्यात निर्विवाद पणे पडून सबका विकासाला आपली पसंती दिली. सुरुवातीला छान वाटलं हि. मोदींच्या अधून मधून भावून भाषाणांनी वाटलं हा जनतेची काळजी करणारा काळीज असलेला नेता आहे. पण सत्तेची हवा डोक्यात जायला वेळ लागत नाही. लोकपाल बिलाच्या लढ्यातून अण्णा हजारे देशभर प्रसिद्ध झाले अन सच्च्या सेवका प्रमाणे आपलं कार्य करून बाजूला झाले सर्व प्रसिद्धी झोतापासून, सर्व कॅमेऱ्याच्या फ्लॅशपासून. पण त्यातून एक राक्षस बाहेर पडला ज्याने दिल्ली ची वाट लावली. दिल्ली ची लोकं हि तितकीच मूर्ख म्हणा एकाच वेड्याला दोनदा सलग मुख्यमंत्री तर महाराष्ट्रात सुद्धा कोणी केले नाही. पण हिंदू रक्षक म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या नेत्यांचं हिंदू प्रेम हे काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमापेक्षाही खोटं ठरत तेव्हा कळत हि गर्मी खुर्चीची आहे. हा माज सत्तेचा आहे.
धर्माच्या, जातीच्या नावावर आजपर्यंत मतं मागणार निर्लज्य भाजप सरकार आता विशिष्ट लोकांचं लंगूनचालन करण्यासाठी सरकारी कार्यालयातील पूजाअर्चा बंद करू पाहतेय. युपी बिहार मध्ये जातीय राजकारणात गुढग्यापर्यंत पाय रोवलेले भाजपचा दुटप्पी पणा हा भयंकर विश्वासघातकी आहे.
भाजप ला लोकांनी विकासाच्या नावावर कौल दिला. भाजपच्या प्रत्येक निर्णयाला जरी विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला तरी जनतेने तो निर्णय शिरसंधान मानला. नोटबंदी, पॉर्नबंदी, चित्रपट पायरसी बंदी अश्या अनेक बंदया लोकांनी मुकाट सहन केल्या. ह्याचाच कि काय माज आजच्या शाह-मोदी कंपनी ला आला की आता डायरेक्ट लोकांच्या श्रद्धेवरच घाला घातलाय. भारताचे पंतप्रधान वर तत्सम त्यांच्या पक्षातील सर्वच नेते ट्विटर फेसबुक वर ज्या ना त्या सणाला लोकांना शुभेच्छा देताना स्वतः पूजा करतानाचे फोटो पोस्ट करतात. आणि महाशय लोकांवर पूजाअर्चा बंदी घालतात.
जनतेला इनकम टॅक्स घोषित करा म्हणून घास फोडून सांगणाऱ्या भाजपच्या सरकार चा खोटारडेपणा आणि विश्वासघातकी पण किती मुरलेला आहे हे ह्याच बाबीवरून लक्षात येते की ते स्वतः त्यांच्या पक्षाला येणारे नोट रुपी दान कुठून पदरात पडते हे घोषित हि करत नाहीयेत. लोकांना इनकम टॅक्स भरायला लावणाऱ्या सरकार ने राजकीय पक्षांना(त्यांच्या स्वतःच्यासुद्धा) काहीच कर भरावा लागणार नाही अशी तरतूद करून घेतलीये.
बाबरी मशिदीत तोडफोड करून नामानिराळे झालेले हे दुतोंडी चोर स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी हि घेऊ शकत नाहीत. आधी बाबरी मशीद पाडण्यात आमचा काहीच हात नाही असे सांगणारे भाजपवाले नंतर संसदेत चांगुलपणाचा आव आणत माफीनामा सादर करत होते. राम मंदिर हा विषय तर रस काढून झालेल्या उसापेक्षा कोरडा विषय झालाय. बाबरी मशिदीत धार्मिक मुद्यावरून मतांचं राजकारण करणारे भाजपीय नेते आता सरकारी कार्यालयातील देवदेवतांच्या पुजांवर बंदी आणतायत. अयोध्येत खरंखुरं राम मंदिर बांधून दिलं तर निवडणुकीत भावना भडकावणार कश्या? माझ्या ह्या आधीच्या लेखातील उल्लेख पून्हा नमुद करू इच्छितो. लोकांच्या तोंडाला पानं पुसायला अयोध्येतील राम मंदिर मुंबईत जोगेश्वरी-गोरेगाव च्या मध्ये बांधलं. तोंडाला पानेच पुसायची होती तर आपट्याची पुसायची?
बाळासाहेबांनी भाजप ला आपल्या खांद्यावर ४० वर्षे घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. तेव्हा जेव्हा भाजप कडे लोकांना द्यायला खात्रीलायक एकही नेता नव्हता. तेव्हा भाजप सेना1 युतीची सारी जबाबदारी बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलली. सेनेचं बोट पकडून महाराष्ट्रात आपला जम बासावणाऱ्या भाजपला आता सेनेच्या उपकारांचा विसर पडलाय. दानवेसारखा भाजप मधला नेता जेव्हा म्हणतो की भाजप हा मोठा भाऊ आहे तेव्हा ह्यांनी सेनेच्या उपकरणांना केराची टोपली दाखवलीय हेच लक्षात येत.
अमित शाह मराठी द्वेषी आहे. त्याच्या हातात मुंबईची कमान दिली तर काय होईल? इतर भाषिक लोकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईत हिंदुतून भाषण करतात आणि रोज मुंबई बदलू मुंबई बदलू अशी भाषा करतात.मुंबई बदलू म्हणजे नक्की काई? मुंबईचं मराठीपण संपवू असं तर नाही ना? गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ट्विटर वर इंग्रजी, हिंदी अन गुजराती भाषेतून देताना सोयीस्कर मराठीचा विसर पडतो आपल्या मुख्यमंत्रि साहेबांना.
तर एकंदरीतच अश्या केसाने गळा कापणाऱ्या भाजपच्या लोकांना मुंबई देऊन विषाची परीक्षा घ्यायची कि सेनेच्या पारड्यात मत देऊन निश्चिन्त राहायचं?
पंकज कानडे
९८९२६४५७४२

No comments:
Post a Comment