घालूनी साद
मराठी हात
मांडला थाट
भव्य दिव्य..||१ ||
मराठी बाज
भगवे राज्य
महाराष्ट्राने केले
काम पूज्य..||२ ||
सांडूनी रक्त
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
मराठी हात
मांडला थाट
भव्य दिव्य..||१ ||
मराठी बाज
भगवे राज्य
महाराष्ट्राने केले
काम पूज्य..||२ ||
सांडूनी रक्त
फोडुनी छाती
प्राण वेचीला
स्वराज्यासाठी..||३||
हाती समशेर ..
छातीची ढाल
केला पराक्रम
दर साल..||४||
महाराष्ट्राची माती
देशाची ती जननी..
केली पवित्र ती
टिळक सावरकरांनी ||५||
अशी हि महाराष्ट्र वारी
भगवी पताका दिसे हर दारी
चरणी लीन होई ज्यांच्या
पांडुरंग वासुदेव हरी..||६||
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
पंकज कानडे..
No comments:
Post a Comment